क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 ते 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय उर्वरित व मनपा शालेय धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धा 2025-26 या शनिवार, दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघांतील 100 खेळाडूंनी (53 मुले व 47 मुली) सहभाग नोंदवला. त्यामध्ये उर्वरित गटात 12 संघ (22 मुले व 26 मुली) तर मनपा गटात 5 संघ (31 मुले व 21 मुली) यांचा समावेश होता.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विनोदजी पाटील सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पाटील सर आणि सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. विशाल बोडके व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेची पूजा करून तसेच श्रीफळ वाहून आणि प्रातिनिधिक स्वरुपात धनुर्विद्येचे प्रात्यक्षिक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात श्री. विनोदजी पाटील यांनी खेळाचे महत्व अधोरेखित करत “खेळ ही केवळ स्पर्धा नसून जीवनाचा शिस्तबद्ध मार्ग आहे, प्रत्येक खेळाडू विजेता असतो.धनुर्विद्येसारखा खेळ एकाग्रतेचा धडा देतो., खेळ हे मैत्रीचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे.” तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान गुरुकुल विभाग प्रमुख श्री. शशिकांत पाटील व श्री. सुर्यकांत पाटील यांचीही उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. गीतास साथ-संगत श्री. भूषण गुरव यांनी दिली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. आर्या ठोंबरे व कु. नंदिनी देसले यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय क्रीडाशिक्षक श्री. ललित लोहार यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सिद्धार्थ शिंदे यांनी मानले.स्पर्धेस यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक श्री. ओम कोळी, श्री. वासिम, श्री. दीपक बनसोडे, श्री. डी.आर. नेहेते, श्री. ललित लोहार, श्री. प्रतिक नगराळे, श्री. हरिभाऊ राऊत, श्री. पवन पाटील, श्री. राजेश अडकमोल तसेच मनपा क्रीडा प्रशिक्षक श्री. धीरज जावळे, सौ. सोनवणे मॅडम, श्री. घुगे सर, श्री. विसपुते सर यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून श्री. ललित लोहार यांनी कार्यभार सांभाळला तर त्यांना श्री. सिद्धार्थ शिंदे आणि सर्व क्रीडा शिक्षक व शालेय परिवाराचा मोठा पाठिंबा लाभला.
