Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
बातम्या

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Team YuvaDishaBy Team YuvaDishaFebruary 24, 20261 Comment14 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

राज्यातील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा’ (पोकरा) दुसरा टप्पा सुरू करण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या योजनेची घोषणा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडल्याने आमदार खडसे यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद सभागृहात विशेष उल्लेख सूचना क्र. २३ द्वारे सरकारचे लक्ष वेधले होते.

यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्राद्वारे माहिती देताना स्पष्ट केले आहे की, राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ‘डीबीटी’ पोर्टलवर अर्ज करता येणार आहेत. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एकूण १२५७ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ८९९ उमेदवारांना नियुक्ती पत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ७९२ उमेदवार प्रत्यक्ष कामावर रुजू झाले असून, उर्वरित रिक्त पदांचा कार्यभार अतिरिक्त जबाबदारीद्वारे हाताळला जात आहे.

आमदार खडसे यांच्या आग्रही भूमिकेमुळे आता ग्रामस्तरावर ‘ग्राम कृषी विकास समिती’चे गठन पूर्ण झाले असून, समूह सहाय्यक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला सुरुवात झाली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

1 Comment

  1. Pawara tulasidas Ramchandra on February 24, 2026 10:47 pm

    My fild coching

    Reply
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.