जळगाव- के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील (स्वायत्त संस्था ) पॉलीटेकनिक प्रथम वर्ष संगणक विभागतील विद्यार्थ्यांची विकास दूध फेडेरेशन ला शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते . विकास दूध फेडेरेशन चे प्रतिनिधी जागृती राजपूत यांनी विविध प्रकारच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली तसेच विकास दूध डेअरी” मध्ये संगणकाचा वापर मुख्यत्वे डेटा व्यवस्थापन, हिशोब ठेवणे (accounting), ग्राहक आणि पुरवठादार व्यवस्थापन (CRM/SCM), इन्व्हेंटरी कंट्रोल (साठा नियंत्रण), उत्पादन प्रक्रियांचे निरीक्षण (monitoring), आणि विपणन (marketing) यांसारख्या कामांसाठी केला जातो, ज्यामुळे कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकता येते, जसे की इतर कोणत्याही आधुनिक डेअरीमध्ये होतो. दुधाच्या तपासणीचे (Testing) निकाल संगणकात नोंदवणे,उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवणे (Monitoring).दुधाच्या गुणवत्तेचा डेटा, दूध उत्पादकांकडून येणाऱ्या दुधाची नोंद, आणि ग्राहकांची माहिती संगणकात साठवणे.इ माहिती करीता संगणकाचा वापर केले जातो . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन तर पॉलीटेकनिक चे समन्वयक प्रा बी जे लाठी यांचे प्रोत्साहन लाभले . संगणक विभाग प्रमुख प्रा स्नेहल पवार ,आयोजक प्रा मुरलीधर चौधरी ,प्राध्यापक वृंद उपस्थित होते .
