मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ
BLO अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात लवकरच मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून विविध मोहिमा सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये Person to Person Mapping व Progeny Mapping या मोहिमांचा समावेश आहे.
Person to Person Mapping अंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सन २००२ च्या मतदार यादीतील नोंदींशी जुळविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. तर Progeny Mapping मोहिमेत सन २००२ च्या मतदार यादीत प्रत्यक्ष नाव नसलेल्या मतदारांची नोंद त्यांच्या रक्तनात्यातील मतदारांशी जोडून पडताळणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदारांच्या घरोघरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी BLO अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांच्या छायांप्रती उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक राहावी, तसेच पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित व्हावी, यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
