कंडारी गावातील ग्रामपंचायत लिपिक गोपाल रिवाजकर यांची कन्या शुभांगी रिवाजकर हिची केंद्रीय राखीव पोलीस दलात ( CRPF ) यशस्वी निवड झाल्याने संपूर्ण कंडारी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आनंददायी प्रसंगी कंडारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट अनिल वसंतराव पाटील यांनी शुभांगी व तिच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन फुलगुच्छ देत अभिनंदन केले. गावकऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव करत या यशाचे कौतुक केले.
यावेळी डॉ. शामकांत चिमणराव पाटील, सोसायटी सचिव हिरालाल भावसार, मा. उपसरपंच सुनील सुर्वे, तसेच सुधीर सुर्वे, मनीष सुर्वे, अमोल पाटील, मल्हार सुर्वे, हर्षल बाविस्कर, प्रवीन धनगर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश इतर तरुण-तरुणींना प्रेरणादायी असून, शुभांगीच्या कठोर परिश्रमांचे आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याचे हे फलित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
