जळगाव – के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘रिदम 2026’ उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाची सुरुवात सांस्कृतिक दिवस साजरा करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध पोशाख, बहुविध संस्कृतींची सांगड घालत उत्साहात साजरा केला. महाविद्यालयातर्फे बॅडमिंटन, मेहंदी, रांगोळी, साडीडे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ. व्ही. एस. झोपे, स्नेहसंमेलन समन्वयक सौ. रुपाली खंबायत, प्रा.संदीप पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नृत्य, समूह नृत्य, नाटिका, गायन तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पारंपारिक गीते, लोकगीते असे विविध कलागुण सादर केले. पारितोषिक वितरण मु.जे.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. पी. नारखेडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी स्नेहसंमेलनात भाग घेणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
