जळगाव -येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.पराग जहागिरदार यांनी ‘ स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचे विचार समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहेत. युवकांनी विवेकानंदांच्या विचारांची कास धरल्यास नव्या भारताची उभारणी करणे सहज साध्य आहे. चारित्र्य संवर्धन, बल संवर्धन आणि ज्ञानसंवर्धन करून युवकांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणावा. असे प्रतिपादन डॉ.पराग जहागिरदार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं ना. भारंबे, जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सदस्य व सहाय्यक लोकअधिरक्षक ॲड. शिल्पा रावेरकर, उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील व समितीचे अध्यक्ष प्रा गणेश सूर्यवंशी हे व्यासपीठावर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद, माँसाहेब जिजाऊ , अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रा गणेश सुर्यवंशी यांनी केले. प्रमुख व्याख्याते डॉ. पराग जहागिरदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र व त्यांच्या तत्वज्ञानाच्या वैविध्यपुर्ण पैलूबद्दल विस्तृत माहिती दिली. भारताच्या उत्थानासाठी युवक हा केंद्रस्थानी आहे. शिक्षणामुळे जाणिव निर्माण होत असते व हीच जाणिव युवकांमध्ये जागृत झाली तरच देशाच्या कल्याणासाठी ते सज्ज होऊ शकतील. विवेकानंदच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातील तत्त्वज्ञानामुळे भारताचे नाव जागतिक पटलावर प्रभावीपणे कोरले गेले. हाच दृष्टिकोन वर्तमानात भारतीय समाजात सामाजिक भान आणण्यासाठी होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय समाजात सहिष्णुता व सर्वसमावेशकता हे घटक भारताला वेगळे बनविते. स्वामी विवेकानंद यांच्या या घटकांच्या प्रचारामुळे त्यांच्या जीवनाला नविन आयाम मिळाला असे त्यांनी सांगितले. तर ॲड.शिल्पा रावेरकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सुविधांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .एस. एन. भारंबे यांनी युवक हा समाजाचा कणा आहे व त्यांनी नविन संकल्प करून भारतीय समाज घडवावा असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हेमंत पिंपळे, प्रा. दिपक चौधरी, प्रा.संध्या महाजन , प्रा.संदीप वानखेडे, प्रा. पल्लवी फिरके, प्रा. स्वप्निल धांडे व प्रा संदिप गव्हाळे, श्री.विजय जावळे, श्री.चेतन वाणी यांनी सहकार्य केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
