मूळजी जेठा महाविद्यालय तेज गंधर्व शास्त्रीय गायन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र स्वरदा संगीत विभाग, जळगाव आयोजित विभागातील माजी विद्यार्थी स्व.कु. तेजस नाईक यांच्या स्मूती दिनानिमित्त मु.जे.महाविद्यालयात जुना कॉन्फरन्स हॉल येथे दिनांक- १४ डिसेंबर २०२५ वार – रविवार रोजी सकाळी ०९:०० वाजता शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या सुरुवातीला मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वदोडकर, स्व.कु.तेजस नाईक चे आई- सवर्णा नाईक, वडील-नितीन नाईक यांच्या उपस्थितीत तेजस ला आदरांजली देण्या करिता हे मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून लहान गट वय ८ ते १५ वर्ष व मोठा गट १६ ते २८ वर्ष असे, लहान गटात १५ विद्यार्थी व मोठ्या गटात १९ असे एकूण ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.प्रा.अविराज तायडे (नाशिक), प्रा.श्री.ज्ञानेश्वर कासार (नाशिक) यांनी केले. पारितोषिक वितरण :- या स्पर्धेचे पारितोषिक वितरण के.सी.ई.सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या सौ.शिल्पा बेंडाळे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वदोडकर, स्व.कु.तेजस नाईक चे आई- सुवर्णा नाईक, वडील-नितीन नाईक, परीक्षक डॉ.प्रा.अविराज तायडे (नाशिक), प्रा.श्री.ज्ञानेश्वर कासार (नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा निकाल :- स्पर्धेत लहान गटात प्रथम पारीतोषीक स्पंदन विजय भाजपाले (अमरावती), द्वितीय पारितोषिक संकल्प संभाजी काळे (छत्रपती संभाजी नगर), तृतीय पारितोषिक दुर्वा दिनेश संन्याशी (जालना) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक राघव राजेंद्र पाटील (धुळे) या स्पर्धकांनी मिळवले. तसेच मोठ्या गटात प्रथम पारितोषिक युगंधरा गजानन केचे (छत्रपती संभाजी नगर), द्वितीय पारितोषिक शिवम दीपक शर्मा (अकोला), तृतीय पारितोषिक प्रतिक गुलाब साळुंखे (जालना), पार्थ सुशांत दायमा (जालना) या स्पर्धकांना विभागून देण्यात आले आणि उत्तेजनार्थ पारितोषिक वैष्णवी राजेंद्र केऱ्हाळे (भुसावळ) या स्पर्धकांनी मिळवले. स्पर्धकांना रोख बक्षिश आणि सम्मान चिन्ह वितरण करण्यात आले. यास्पर्धेसाठी वाद्यांची साथसंगत संगीत शिक्षक श्री.राहुल कासार (तबला), अक्षय गजभिये (हार्मोनियम), अनुज पाटील (तबला) तर या स्पर्धेचे सूत्रसंचालन संगीत विभागातील विद्यार्थिनी कु.राजेश्वरी रत्नपारखी हिने केले. या स्पर्धेचे आभार प्रा.प्रसाद देसाई यांनी केले. हि स्पर्धा यशःस्वी करण्यासाठी स्वरदा संगीत विभाग प्रमुख प्रा.मंगेश वाघ, प्रा.देवेंद्र गुरव, प्रा.मयुरी हरिमकर, ललित कला विभाग प्रमुख प्रा.मिलन भामरे, प्रा.पियुष बडगुजर, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, श्री.संजय जुमनाके, रेडियो मनभावन प्रमुख श्री.अमोल देशमुख, सौ.शुभांगी बडगुजर आणि संगीत विभागातील विद्यार्थी मानस नाईक, अनुज पाटील, भागवत पवार, सोमनाथ बागुल, प्रशिक सपकाळे, आणि विद्यार्थिनी सलोनी मोरे,प्रज्ञा तांबट, ख़ुशी दायमा, कृतिका कोरे, ग्रीष्म पाठक, सिद्धी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
