जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट (पुरुष) स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन दिनांक १५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिली मॅच दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी पी.जी.यू.जी. जिमखाना व अरुणामाई फार्मसी कॉलेज यांच्यात झाली. या सामन्यात पी.जी.यू.जी. जिमखाना संघ विजयी ठरला. त्याच दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात नूतन मराठा महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात लढत झाली असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजय संपादन केला. दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सामन्यांमध्ये एस.एस. मणियार विधी महाविद्यालय विरुद्ध एस.ए. बाहेती महाविद्यालय या सामन्यात एस.एस. मणियार विधी महाविद्यालय विजयी ठरले. तसेच व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय विरुद्ध के.सी.ई. आय.एम.आर. या सामन्यात के.सी.ई. आय.एम.आर. संघाने विजय मिळविला. एस.एम.सी. महाविद्यालय व डी.एन. कॉलेज, फैजपूर यांच्यातील सामना बाय मिळाल्यामुळे एस.एम.सी. महाविद्यालय, फैजपूर संघ विजयी ठरला. यापुढील फेरीत एम. जे. कॉलेज, पी. ओ. नाहाटा महाविद्यालय तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालय यांच्यात लढती होणार असून स्पर्धेची अंतिम मॅच दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय व डॉ. संतोष बडगुजर काम पाहत आहेत. स्पर्धेचे पंच म्हणून श्री. योगेश महाजन व श्री. चेतन सोनवणे काम पाहत आहेत. सदर स्पर्धा एम. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व स्पर्धा आयोजन समिती सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा नियमांनुसार घेण्यात येत आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
