
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धा १६ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत होतील.
या विभागीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
* प्रमुख उपस्थिती:
* मा. ना. प्रा. डॉ. अशोक जनाबाई वुईके, (मंत्री, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते.
* मा. ना. श्रीमती रक्षाताई निखिल खडसे (राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार).
* मा. ना. श्री. गिरीश गिता दत्तात्रय महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य).
* मा. ना. श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील (मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगांव).
* मा. ना. श्री. संजय सुशिला वामन सावकारे (मंत्री, वस्त्रोउद्योग महाराष्ट्र राज्य).
* मा. ना. श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक (राज्यमंत्री, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, पर्यटन इ.).
* या समारंभास इतर मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी विशेष उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता होणार आहे.
* हा समारंभ मा. श्रीमती लिना बनसोड (भा.प्र.से.), आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या शुभहस्ते पार पडेल.
या स्पर्धांमध्ये एकूण ३००० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, श्री. दिनकर जि. पावरा आणि इतर प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
या स्पर्धांमध्ये नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. विभागातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडास्पर्धांद्वारे निवड झालेले विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी होतील तसेच त्यांचे आरोग्यविषयक जाणीव, संघभावना व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

2 Comments
Pawara tulasidas Ramchandra
5km