*अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर उपचार सुरू*
जळगाव.दि- 6 ( जिमाका ) उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजता एक भीषण अपघात झाला. अयोध्या येथून देव दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या टूरिस्ट बसला वेगवान ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात पिंपळा येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला तर अपघातात ११ जण जखमी झाले असून जखमी झालेल्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ
मदत कार्य सुरु झाले असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येशील ३० महिला व ५ पुरुष असा ग्रुप अयोध्या येथे सहलीला गेला असता त्यांचा सुलतानपूर जवळ अपघात झाला यात पिंप्राळा तालुका जळगाव येथील छोटीबाई शरद पाटील वय ५५ या एक महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ४४ भाविक होते. हे सर्व जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.
या अपघातात जखमी झालेल्या भाविकांना जिल्हा प्रशासनान तर्फे,रेल्वेचे परत येण्याचं तिकीट काढून देण्यात आले असून मयत झालेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या सोबत घेऊन येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून दिली असून ही ॲम्बुलन्स दुपारीच जळगाव कडे येण्यासाठी रवाना झाली आहे.
या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व मंत्री, खासदार, आमदार जिल्हाधिकारी, या मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
याबाबत सुलतानपूर स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात असून अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर सुलतानपूर येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती, जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी दिली आहे.
**********
