Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»शाश्वत आणि जैविक शेती काळाची गरज; ‘आंतरराष्ट्रीय मृदा दिना’निमित्त तज्ज्ञांचे प्रतिपादन केसीई सोसायटी आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम; ‘मृदा आणि पाणी तपासणी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
बातम्या

शाश्वत आणि जैविक शेती काळाची गरज; ‘आंतरराष्ट्रीय मृदा दिना’निमित्त तज्ज्ञांचे प्रतिपादन केसीई सोसायटी आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम; ‘मृदा आणि पाणी तपासणी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 5, 2025No Comments3 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – शेतीमध्ये सातत्याने होणारा रासायनिक खतांचा वापर आणि बदलत्या हवामानामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ‘माती परीक्षण’ आणि ‘जैविक शेती’ ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी केले. मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी,मूळजी जेठा महाविद्यालयाचा ‘करियर कट्टा’ विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय मृदा दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाश्वत शेती आणि मृदा संवर्धन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी शाश्वत शेती या संकल्पनेवर विशेष भर दिला. केवळ उत्पादन वाढवणे हे ध्येय नसून, जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवणे महत्त्वाचे आहे. यासाठी मातीची सुपीकता वाढवणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी आणि कृषी अभ्यासकांनी जैविक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आधी आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासणे म्हणजेच माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शमा सराफ यांनी तर कार्यक्रमाची भूमिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मांडली. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी ‘मृदा आणि पाणी तपासणी’ हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भविष्यात या विद्यार्थ्यांचे योगदान कृषी क्षेत्रासाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान एम. तडवी, जिल्हा मृदा तपासणी आणि मृदा सर्वेक्षण अधिकारी श्री. अभिनव के. माळी, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते.यावेळी डॉ. शमा सराफ, डॉ. योगेश मोरे, हर्षदा देसले, स्नेहल येउलकर, संदीप रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा अडावदकर यांनी केले, तर आभार सोनाल उपलवार यांनी मानले.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.