जळगाव –
मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील ललित कला विभागांतर्गत बी. एफ.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी भरत श्रवासने या विद्यार्थ्याने बहिणाबाईंच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने विभागात अवघ्या तीन तासात कल्पक असे अर्धाकृती बहिणाबाईंचे शाळू मातीद्वारे शिल्प साकारले. या वेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे ललित कला विभाग प्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा.पियुष बडगुजर, प्रा. ऋषी इसाने, प्रा. दिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ यांनी विद्यार्थ्यास प्रेरणा देत शिल्प निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या अर्धकृती शिल्पाचे बहिणाबाईंच्या स्मृतिदिनी पूजन प्राचार्य प्रा . डॉ. एस एन भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. भरत श्रवासने यांनी केलेल्या शिल्पा बद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी कौतुक केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
