
विद्यार्थी विज्ञान मंथन 2025 परीक्षेचा स्टेज 2 (जिल्हा स्तरीय) चा निकाल ३० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. प्रा. डॉ. प्रेमजित जाधव आणि ऍड. सौ किरण जाधव यांची कन्या शर्वरी जाधव हिची महाराष्ट्र राज्य देवगिरी प्रांत स्तरातून (१४ जिल्ह्यांमध्यून) महाराष्ट्र राज्यस्तरावर निवड झाली आहे, शर्वरी ही ओरायन सी.बी.एस.सी. इंग्लिश माध्यम शाळा जळगाव येथे इयत्ता सातवीत शिकत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका,शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करू शकले असे मत शर्वरीने व्यक्त केले,यापुढे जाऊन आता राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर जाण्याचे आपले स्वप्न आहे असे तिने सांगितले. विज्ञान भारती द्वारे विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते. विज्ञानाचे प्रचार प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे हे या परीक्षेचे उद्दिष्ट आहे.
