महाराष्ट्र : राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलिस भरती २०२४-२५ साठी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून ७ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली असल्याची माहिती विशेष बाब म्हणून एडीजी (ट्रेनिंग) यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
राज्यातील पोलीस दलातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. भरती पोर्टलवर शेवटच्या काही दिवसांत होणारी वाढती गर्दी आणि सर्व्हरची समस्या लक्षात घेऊन ही निर्णयप्रक्रिया करण्यात आली असल्याचे समजते.
या मुदतवाढीमुळे अजूनही अर्ज न भरलेल्या उमेदवारांना आता सुटकेचा श्वास मिळाला असून, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहणार असून, उमेदवारांनी अधिकृत भरती पोर्टलवरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य पोलिस भरतीबाबत उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वाढीव मुदतीमुळे अधिकाधिक युवकांना या संधीचा फायदा घेणे शक्य होणार आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
