जळगाव -केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाची इंडस्ट्रियल व्हिझिट चे आयोजन करण्यात आले होते . इलेक्ट्रिकल विभागातील जवळपास ३८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नाशिक इथे फॉर्चुना इंजिनिअरिंग प्रा ली .या कंपनीला भेट दिली कि त्या कंपनी मध्ये सर्व इंजिनचे पार्ट ,तसेच उत्पादन आणि ऑटोमेशन या बद्दल माहिती मिळाली . पारंपारिक कनेक्टिंग रॉड डिझाइनला फ्रॅक्चर-स्प्लिट डिझाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी पर्यायी डिझाइन सुचवण्याची क्षमता असते . कॉनरॉड्स मध्यम कार्बन स्टील आणि सी-७० स्टील फोर्जिंगपासून बनवले जातात.रॉड्सच्या निर्मितीमध्ये अॅल्युमिनियम कास्टिंग देखील वापरले जातात. कॉनरॉड्स सेरेटेड, ग्रूव्ह आणि टेनॉन जॉइंट्स किंवा बोल्ट आणि नट डिझाइनमध्ये येतात. मुख्य कौशल्य फ्रॅक्चर्ड कॉनरॉड्सच्या निर्मितीमध्ये आहे.उच्च कार्यक्षमता असलेल्या इंजिनांच्या कडकपणा आणि ताण सहन करण्यासाठी रॉडला दीर्घ आयुष्य मिळते.या औद्योगिक अभ्यास भेटीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा सचिन नाथ ,प्रा मनीष महाले ,प्रा उमाकांत कोठोके ,प्रा रुची गुल्हाने होते .इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ प्रसाद कुलकर्णी ,अकॅडमिक डीन प्रा .राहुलकुमार पटेल ,आय क्यू ए सी समन्वयक प्रा कल्पेश महाजन यांनी अभ्यास दौऱ्याला प्रोत्साहन दिले .
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
