स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे संविधान दिनाचेऔचित्य साधून अत्यंत माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला. उप प्राचार्य श्री आर बी ठाकरे सर यांनी उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संविधान म्हणजे काय, संविधानाचे महत्त्व काय, आपल्या भारत देशाचे संविधान जगातील सर्व देशाच्या संविधानांपेक्षा किती वेगळे व महत्त्वपूर्ण आहे हे समजावून सांगण्यात आले. संविधान निर्मिती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे अतुलनीय कार्य अधोरेखित करण्यात आले. बाबासाहेब संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. भारतीय नागरिक म्हणून आपले अधिकार, कर्तव्य व देशाप्रती प्रत्येक नागरिकाचे असलेले कर्तुत्व समजून घेण्यात आले. तसेच बारावीची विद्यार्थिनी संजना इंगळे हिने आपल्या भाषणात संविधानातील महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करत अतिशय प्रभावीपणे संविधानाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापिका सुरेखा पुंडलिक पाटोळे यांनी केले त्यांनी संविधानाची निर्मिती मागील काही महत्त्वाच्या घटना सांगितल्या. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक उमेश पाटील , प्राध्यापक सौ स्वाती बर्हाटे इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. संदिप वानखेडे, व समितीचे सदस्य प्रा. सुरेखा पाटोळे प्रा. ज्योति सोनवणेआणि पूजा सायखेडे यांनी सहकार्य केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
