जळगाव- के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम सपन्न. जळगाव : के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.केतन चौधरी उपस्थित होते. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.संभाजी जमधडे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली व मुलींसाठी शिक्षणाची कवाड उघडून कशाप्रकारे स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली याविषयी माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी कशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक विरोध पत्करून मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एड प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.करिष्मा तडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.शिवानी जाधव यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापकवृंद व प्रथम वर्ष बी.एडचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
