एम. जे. कॉलेजच्या सोहम योग विभागामध्ये धात्री आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २८ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन योग विभागाच्या हॉलमध्ये करण्यात आलेले आहे.
या शिबिरामध्ये शुगर, ब्लडप्रेशर आणि कराडा स्कॅन या तपासण्या पूर्णतः नि:शुल्क स्वरूपात करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये सर्व वयोगटातील महिला पुरुष सहभागी होऊन आपली तपासणी करून घेऊ शकतात. त्याचबरोबर योग आणि आयुर्वेद विषयक मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतात. या तपासण्यांसाठी धात्री आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डॉ. गणेश पाटील, डॉ. हर्षदा पाटील, सोहम योग विभागातील प्रा. ज्योती वाघ, प्रा. श्रद्धा व्यास, प्रा. पंकज खाजबागे यांचे सहकार्य लाभणार आहे.
सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन एम. जे. कॉलेजचे प्राचार्य संजय ना. भारंबे, सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे.
