जळगाव –
के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे द्वितीय आणि तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लॅटेक्स आणि सिलॅब ,पायथॉन 3.4.3 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन एक आठवडाभर करण्यात आले होते . भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुबईच्या संयुक्त विद्यमाने हि कार्यशाळा आयोजित करून सॉफ्टवेअर ची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला . या ऑनलाईन कार्यशाळेत सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर चा कसा उपयोग करावा या बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले . अंतिम वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांना पायथॉन 3.4.3 संकल्पनेची माहिती देण्यात आली. तसेच कोडिंग भाषेचा उपयोग करून विविध प्रकारची नवनवीन सॉफ्टवेअर कसे तयार करावेत या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली .विद्यार्थ्यांनी ओपन फ्री सॉफ्टवेअर चा उपयोग जास्तीत जास्त करावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केले आहेत . या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले .एफ ओ.ओ एस समनवयक् प्रा.अविनाश सूर्यवंशी, वर्कशॉप कोऑर्डिनटोर प्रा . रुची गुल्हाने यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.या कार्यक्रमाला अकॅडमिक डीन प्रा.राहुल पटेल,आय क्यू ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन ,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ प्रसाद कुलकर्णी,प्रा सचिन नाथ,प्रा.उमाकांत कोठोके ,प्रा.मनीष महाले उपस्थित होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
