जळगाव – के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे “संविधान दिन” साजरा करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.केतन चौधरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.संभाजी जमधडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेतले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारताला राज्यव्यवस्था चालवण्यासाठी कशाप्रकारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून पुढे आलेल्या स्वातंत्र्य, समानता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांचा समावेश घटनाकारांनी भारतीय संविधानात केला आहे याविषयी माहिती दिली.विद्यार्थी शिक्षक हरीश महाले,विकास भोई , दिगंबर सुरवाडे ,आदित्य ननावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी संविधान कशाप्रकारे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक ,राजकीय ,आर्थिक स्वतंत्रता बहाल करते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजस्वरी बुंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.हर्षाली ताडे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापकवृंद व प्रथम वर्ष बी.एडचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
