सध्याच्या कडाक्याच्या थंडीचे दिवस पाहता एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सकाळ – यिन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत जुने कपडे, स्वेटर व ब्लँकेट वाटप करण्यात आले. मणियार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या संवेदनशील भावनेतून स्वतःचे, कुटुंबीयांचे कपडे व ब्लँकेट देत आपल्या राहत्या परिसरातूनदेखील हे साहित्य गोळा केले होते. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर, सरकारी रुग्णालय परिसर व गरीब झोपडपट्टी क्षेत्रातील गरजू लोकांना हे साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य स्वीकारत असताना सर्व गरजूंनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. या स्वयंसेवकांनी या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले होते. प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक करत एनएसएस विभागाच्या या समाजोपयोगी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. एनएसएस समन्वयक प्रा. जी. व्ही. धुमाळे यांच्या मार्गदर्शनानुसार ईश्वर मांडोळे, जागृती महाजन, सागर बाविस्कर, रुपाली पाटील, सुरज शर्मा, नेहल चौधरी, आदित्य भोलानकर, कमलेश सोनवणे, हेमलता महाजन, निलेश चव्हाण, नेहा छाडीकर या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. यावेळी प्रा.डॉ. डी. आर. क्षीरसागर, प्रा.डॉ. रेखा पाहूजा, प्रा.डॉ. योगेश महाजन, प्रा.डॉ. विजेता सिंग, प्रा.डॉ. अंजली बोंदर, प्रा. बी. एस. पाटील, प्रा.डॉ. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. नितीन मटकरी हे उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
