योग आणि आयुर्वेद मधुमेह प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. औषध, आहार आणि दिनचर्या या तिन्हींचा संतुलित वापर केल्यास मधुमेह टाळता आणि नियंत्रित करता येतो. असे प्रतिपादन डॉ. गणेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून केले. सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम. जे. कॉलेज, जळगाव यांच्या वतीने शनिवार दि. २२ रोजी “मधुमेह प्रतिबंधासाठी योग आणि आयुर्वेदाचा समन्वय” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. गणेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश पाटील डॉ.हर्षदा पाटील आणि सोहम योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थीत होते. सोहम योग विभाग आणि धात्री आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह दिनानिमित्त मधुमेहग्रस्तांसाठी नि:शुल्क योग आणि आयुर्वेद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत डॉ.गणेश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मधुमेहाचे वाढते प्रमाण, कारणे, शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींची भूमिका तसेच तणाव, चिंताग्रस्तता, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या जीवनशैली विकारांवर सखोल प्रकाश टाकला. योगाद्वारे मधुमेह प्रतिबंध सूर्यनमस्कार, मंडूकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन यांची प्रभावी भूमिका आहे तसेच प्राणायामाचे विविध प्रकार अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान, योगनिद्रा व कपालभाती यांचा नर्व्हस सिस्टमवरील सकारात्मक परिणाम तसेच आयुर्वेदिक उपचार दृष्टिकोनातून त्रिदोष संतुलनाचे महत्त्व आयुर्वेदिक औषधी व काढे, वेळेवर भोजन, इंटरमिटंट फास्टिंग आणि तूप, बाजरी, नाचणी, तांदूळ यांचे पौष्टिक महत्त्व सांगितले. डॉ. गणेश पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार डॉ. देवानंद सोनार यांनी केले सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाघ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योग विभागातील प्रा. पंकज खाजबागे आणि डॉ. श्रद्धा व्यास यांचे सहकार्य लाभले. समाजामध्ये आरोग्यजागृतीसाठी अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन उपयुक्त ठरते. हा उपक्रम समाजात आरोग्य जाणीव वाढविण्यासाठी, मधुमेहाच्या व्यवस्थापनावरील योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग–आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
