राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार यांच्या वतीने हरियाणा येथे कुरुक्षेत्र विद्यापीठांमध्ये दिनांक 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मूळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु. जागृती गिरासे या विद्यार्थिने सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहा विद्यार्थी व एक संघ व्यवस्थापक यांची निवड करण्यात आली होती कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहा स्वयंसेवक शिबिरामध्ये सहभागी झाले होते व त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल देशमुख यांनी कार्य केले या शिबिरामध्ये भारतामधील 17 राज्यांचे प्रतिनिधित्व होते व विविध राज्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी व भारताची संस्कृती एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शन केले यामध्ये महाराष्ट्राकडून जागृती गिरासे या विद्यार्थिनीने पारंपारिक लावणी व गोंधळ यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती व कला सादर केली तिच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे यांनी तिचे कौतुक केले व अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा असा आशीर्वाद दिला
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
