जळगाव – के.सी.ई .सोसायटी संचलित
मूळजी जेठा महाविद्यालय, (स्वायत्त) जळगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर होते. सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्प अर्पण करण्यात आले, राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यानंतर डॉ. राजीव पवार यांनी “संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि त्यांची प्रासंगिकता” यावर आपले मत व्यक्त केले. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विशाल देशमुख आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भूषण धनगर यांनी केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
