जळगाव –
के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागातर्फे द्वितीय आणि तृतीय वर्ष विद्यार्थी यांचे करिता कोडिंग अँड डिझाईनिंग चे व्हर्चुअल लॅब द्वारे मार्गदर्शन करण्यात आले . हँड्स-ऑन सत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः सर्किट तयार करणे, कोड लिहून त्याचे व्यवहार्य परिणाम पाहणे, लॉजिकचे डिबगिंग, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक मॉड्युल्सचे ऑनलाइन मॉडेलिंग याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रशिक्षकांनी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या नवीनतम टूल्स व सॉफ्टवेअर्सची माहिती देत विद्यार्थ्यांना रिअल टाइम प्रॉब्लेम सॉलविंग कौशल्य विकसित करण्यावर भर दिला.प्रा रोहन परदेशी व प्रा गजानन पाखरे यांनी प्रशिक्षण दिले . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाचे समन्वयक प्रा स्नेहा पाटील यांनी कार्यक्रम यश्वीतेसाठी मेहनत घेतली . या प्रसंगी डीन ऑफ अकॅडमिक प्रा राहुलकुमार पटेल ,आय क्यू ए सी समन्वयक प्रा कल्पेश महाजन ,विभाग प्रमुख प्रा वैशाली सरोदे यांची उपस्थिती होती
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
