जळगाव-
के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे आपल्या राष्ट्रगीत “वंदे मातरम्” च्या रचनेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध विभागांमार्फत भव्य सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागविणे व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा होता.
महाविद्यालयातील सर्व विभागांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विभागनिहाय स्पर्धांचे आयोजन व समन्वय पुढीलप्रमाणे करण्यात आले:
१. डेटा सायन्स विभाग – निबंध लेखन स्पर्धा
समन्वयक: प्रा. निरंजन पाटील
परिक्षक: डॉ. वीणा भोसले व डॉ. पी. डी. कुलकर्णी
प्रथम क्रमांक: कांचन पाटील
द्वितीय क्रमांक: मानसी निकम
२. कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभाग – वक्तृत्व स्पर्धा
समन्वयक: प्रा. शीतल बोरोले
परिक्षक: प्रा. समाधान खैरे व प्रा. गणेश पाटील
प्रथम क्रमांक: खुशी पाटील
द्वितीय क्रमांक: अदिती शर्मा
३. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग – वादविवाद स्पर्धा
समन्वयक: प्रा. गायत्री सोनार
परिक्षक: प्रा. श्रुतिका घरडे व प्रा. वैशाली सरोदे
प्रथम क्रमांक: मयुरी माळी ,विशाखा चव्हाण
द्वितीय क्रमांक: होमकांत सोनार, शुभम वाघ
४. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग – पोस्टर मेकिंग आणि प्रेझेंटेशन स्पर्धा
समन्वयक: प्रा. रुची गुल्हाणे
परिक्षक: प्रा. शेफाली अग्रवाल
प्रथम क्रमांक: ओंकार जोशी
द्वितीय क्रमांक: लीना चौधरी
५. एम.बी.ए. विभाग – लघुनाट्य
समन्वयक: प्रा. यश चौधरी व प्रा. रेवती पाटील
परिक्षक: प्रा. अविनाश सूर्यवंशी व प्रा. के. बी. पाटील
प्रथम क्रमांक:प्रथम , द्वितीय वर्ष डेटा सायन्स आणि कम्प्युटर अभियांत्रिकी विभाग
द्वितीय क्रमांक: एम बी ए विभाग (हर्षदा पवार
हर्षा ओचानी ,ऐश्वर्या पिंगळे, जान्हवी चांगरे ,रोहित पाटिल ,रोहित सोनवने ,यश पवार ,सारंग पाटिल ,हर्षल रोज़ड़कर)
६. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभाग – लोगो डिझाईन स्पर्धा
समन्वयक: प्रा. गीता पाटील
परिक्षक: प्रा. प्रवीण भंगाळे
प्रथम क्रमांक: धनी कोल्हे
द्वितीय क्रमांक: मानसी सैनी
तृतीय क्रमांक: तुषार पवार
या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” या गीतातून प्रेरित देशप्रेम, सृजनशीलता व वक्तृत्वकौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाज व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे एकत्रित समन्वयन प्रा. रेवती पाटील (सहाय्यक प्राध्यापक, एमबीए विभाग) यांनी केले. सर्व परीक्षकांचे व विभाग प्रमुखांचे विशेष आभार मानण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे डीन् ऑफ अकॅडमिक प्रा.राहुलकुमार पटेल,आय क्यू ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन ,डिप्लोमा विभागाचे समन्वयक प्रा.बी जे लाठी ,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी,उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी जावळे व खुशी पाटील यांनी केले.
