जळगाव- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पल्लवी फिरके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढण्याची शक्ती दिली त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला जागरूकता मिळाली बिरसा मुंडा यांचा स्वातंत्र्यलढ्यातही मोठा सहभाग होता.उलगुलान हा महान उठाव अबुवाराज आमचे शासन याबद्दल भगवान बिरसा मुंडा यांनी केलेले योगदान प्रा संदीप वानखेडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. संदिप वानखेडे, व समितीचे सदस्य प्रा. पल्लवी फिरके , प्रा निवेदिता जोशी प्रा. योजना देसले यांनी सहकार्य केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
