दोंडाईचा वि. प्र.* हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेज व हस्ती वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय तलवारबाजी ( फेन्सिंग ) स्पर्धेत दमदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवत राज्य स्तरावर प्रवेश मिळविला.
जळगाव जिल्हा क्रीडा विभागामार्फत पार पडलेल्या विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धा सेंट अलायन्स हायस्कूल यावल रोड भुसावळ येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचे उद्घाटन मिनल थोरात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राजू शिंदे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते तसेच कैलास कंखरे सचिव धुळे जिल्हा तलवारबाजी संघटना आदी मान्यवर उपस्थित होते.
या ठिकाणी शालेय स्तरावरील १४, १७,१८ वर्ष वयोगटात हस्ती स्कूलचे मुले व मुली सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत हस्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीनही गटात आपला दबदबा कायम ठेवत यश मिळविले. यांत हस्ती स्कूलचे सात मुलांनी यश संपादन करत राज्य स्तरावर प्रवेश मिळविला. यांत १४ वर्ष वयोगटात नील डीगराळे व हस्ती वर्ल्ड स्कूलची स्नेहल राजपूत यांनी यश संपादन केले. १७ वर्ष वयोगटात संयम जैन व प्राची खंडेराय यांनी यश मिळविले. १९ वर्ष वयोगटात मोहित देवरे, समीक्षा सपकाळे, प्रीती मावळे यांनी यश मिळविले.
राज्यस्तरीय स्पर्धा ही १२, १३ व १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केली जाणार आहे.
या यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष उद्योगपती अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, तसेच हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन व संचालक मंडळ, प्राचार्य राजेंद्र त्रिभुवन, प्राचार्य जिवन सपकाळे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, उपप्राचार्या रझिया दाऊदी कौतुक करत अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना हस्ती स्कूलचे क्रीडा शिक्षक विशाल पवार व कामिनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
