जळगाव -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. अशोक राणे होते. सर्वप्रथम सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आले, त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राणे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात वंदेमातरम गीताचे योगदान तसेच वंदे मातरम गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.आकाश बिवाल यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
