जळगाव – एम. जे. कॉलेजच्या सोहम योग विभागाचा उपक्रम जळगाव -१४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे. कॉलेज, जळगाव आणि धात्री आयुर्वेद व पंचकर्म यांच्या संयुक्त विद्यमाने “योगाद्वारे मधुमेहावर नियंत्रण” या विषयावर विशेष निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १४ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सोहम् योग विभाग, आनंदयात्री योग हॉल, मनभावन संकुल, तिसरा मजला, एम.जे. कॉलेज, जळगाव येथे होणार आहे. या कार्यशाळेत मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त योगासने, प्राणायाम, मुद्रा, ध्यान तसेच आयुर्वेदिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागींसाठी शुगर तपासणी, बीपी तपासणी, कराडा स्कॅन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मधुमेहासाठी उपयुक्त आहार पद्धती, अॅक्युप्रेशर पॉइंट्स व मानसिक आरोग्याचे महत्त्व तसेच मधुमेह प्रतिबंधासाठी योग आणि आयुर्वेदाचा समन्वय आणि गर्भावस्थेतील मधुमेह : योग आणि आयुर्वेदाचा उपचारात्मक दृष्टिकोन या विषयांवरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 8793421797 या नंबर किंवा सोहम योग विभाग, एम. जे. कॉलेज येथे संपर्क करावा.
