सावळदबारा (ता. सोयगाव) — सावळदबारा येथील प्रसिद्ध नागोबा व शाली वस्ताद बाबा यात्रा ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेच्या निमित्ताने गावात दुकाने उभारली गेली होती व एकदिवसीय यात्रा मोठ्या जल्लोषात भरली.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी यात्रेच्या ठिकाणाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील (कोलते) यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत समाधान कपाटे यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गुलाबराव पाटील (कोलते) यांनी सांगितले की, “यात्रा संपल्यानंतरही परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे.”
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवसेनेच्या या सामाजिक बांधिलकीचे अभिनंदन केले.
