जळगाव (६ नोव्हेंबर २०२५) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी तयारी सुरू केली आहे. पाचोरा मतदारसंघातील पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असून, शिवसेनेकडून उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमदार किशोर आप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांशी स्वतंत्ररीत्या संवाद साधणार आहेत. पाचोरा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात घेण्यात येतील. तर शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून भडगाव येथील शिवसेना कार्यालयात भडगाव नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील. यावेळी सर्व इच्छुकांनी आपल्या संबंधित प्रभागाची परिपूर्ण माहिती घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
