जळगाव (दि. ३१ ऑक्टोबर २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५) – के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.बी.ए. विभागात “हॅण्ड्स-ऑन सेशन ऑन एक्सेल विथ ए.आय.” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मार्गदर्शन श्रीमती वर्षा पाटील (श्रीकृष्ण कॉम्प्युटर्स) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे मूलभूत ज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून डेटा विश्लेषण, रिपोर्टिंग आणि निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी कशी करता येते हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन क्षेत्रात आपले कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून (एम.बी.ए.) विभागप्रमुख प्रा. शेफाली एम. अग्रवाल यांनी कार्य पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत एस. धनंधरे यांनी केले. तसेच प्रा. डिगंबर बी. सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या प्रसंगी सर्व एम.बी.ए. विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यशाळा अधिक परिणामकारक बनवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासोबतच उद्योगातील डिजिटल साधनांचा वापर करून निर्णयप्रक्रिया सुलभ करण्याचे प्रशिक्षण मिळाले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
