जळगाव-बीड येथे दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या तृतीय राज्यस्तरीय लॅक्रॉस स्पर्धेचे (पुरुष व महिला) आयोजन बीड जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन, बीड आणि बालभिम महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील मितेश चंद्रकांत सोनवणे (बीबीए – पहिला वर्ष) या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. मितेशच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार शिक्षकवृंद आणि सहाध्यायींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच डॉ. नीलिमा पाटील (शारीरिक संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्याच्या या कामगिरीमुळे संस्थेचा झेंडा राज्यस्तरावर अभिमानाने फडकला आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
