Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»ललित लेख /कथा विश्व»छातीवरचे भूत (स्लीप पॅरालिसिस) थरार कथा / विज्ञान कथा
ललित लेख /कथा विश्व

छातीवरचे भूत (स्लीप पॅरालिसिस) थरार कथा / विज्ञान कथा

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 31, 2025No Comments17 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, मग काय आलो मुंबईहून मावशीच्या गावी अकोल्याला फिरायला. मी आलो की आम्ही सर्वजण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी जातोच,त्यादिवशी आम्ही सर्वजण शेगावी जाऊन दर्शन घेऊन नुकतेच अकोल्याला गावी परत आलो. दिवसभर रांगेत लागून आधीच थकलो होतो मग काय जेवलो आणि कुलरच्या गार हवेत झोपलो. मधात मी आणि आजुबाजूला दोन्ही मावसभाऊ झोपले, मावशी काका आणि मावसबहिण बाजूच्या खोलीत झोपायला गेले. रात्री २ – २:३० च्या सुमारास मी लघुशंकेसाठी उठलो, खेडेगावात नीरव शांतता पसरली होती, सर्वत्र काळोख, मी घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये जाऊन आलो, घरात येताना जेव्हा घराचे दार लावले त्या वेळेस अगदी थंड गार हवेची एक झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. काही क्षण तो स्पर्श सुखावून गेला आणि मी स्तब्ध उभा राहिलो. मग पुन्हा आपल्या जागेवर जाऊन झोपी गेलो, थोड्याच वेळात डोक्याजवळ पैंजणाचा आवाज ऐकू येऊ लागला, अर्ध झोपेत असे वाटले सकाळ झाली सर्व उठले आणि चौथीत शिकणारी आपली मावसबहिण शाळेसाठी तयार झाली आणि हा तिच्याच पायातील पैंजणांचा आवाज आहे असा भास मला झाला. हलक्या आणि झोपेतल्या आवाजात मी हळूच तिला बोलले “अगं आवाज नको करू शांत राह मला झोपू दे”. पण ती काही थांबायला तयार नव्हती,पुन्हा आवाज दिला तरी ऐकत नाही, मग मात्र मी जोरात ओरडलो (झोपेतच) आणि काय चक्क तिच्या पैंजणांचा आवाज बंद झाला. आता मी पुन्हा शांत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात तिने माझ्या छातीवर उडी मारली आणि छातीवर धाबकन बसून घट्टपणे माझा गळा आवळायला लागली. ती छातीवर बसताच माझे डोळे उघडले, अत्यंत घाबरलेला गांगरलेला मी जवळच (अगदी अर्ध्या हाताच्या अंतरावर) झोपलेल्या मावस भावांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागलो त्यांना हलवून उठवण्याचा हेतूने,पण जसे की पूर्ण शरीराला तिने विळखा मारलेला न हात हलत होते ना पाय हलत होते आणि ना आवाज निघत होता. ही अशी का करतेय का आपल्या छातीवर बसली आहे म्हणून तिच्याकडे कटाक्ष टाकला तर ती एक शाळेचा ड्रेस घातलेली आणि मोठ्या केसांनी चेहरा झाकलेली मुलगी (आकृती) होती. तीस चाळीस सेकंड काही कळलेच नव्हते आता आपला जीवच जातो की काय बस एवढाच विचार डोक्यात,शेवटी पूर्ण ताकदीनिशी हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या चेहऱ्याकडे हात नेला. तिच्या चेहऱ्याकडे हात जाताच तिने माझे हाताचे बोट दातात धरून चावले, तसंच तिचा जबडा धरून तिला अंगावरून बाजूला फेकून दिले आणि अंथरुणातून धाडकन उठून बसलो. आजुबाजूला बघतो तर काय दिवस नाही तर ती रात्रच, ना कोणी उठलेले, ना छातीवर कोण बसले ते दिसले, ना बोटांना चावायचे निशाण,ना पैंजणांचा आवाज, ना आकृती ना भूत ना मावस बहिण. शेवटी बसलो ते फक्त स्वतःला प्रश्न विचारत, “झालं तरी काय”? मोठ्या विचारात आणि भीतीत पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तो सकाळी उठून कोणाला सांगू त्या विचारात, कसली झोप येते मग नाहीच. कसाबसा सकाळीच मावशी जवळ गेलो आणि झालेला प्रकार तिला सांगितला तेव्हा ती म्हणाली अस तर आमच्या सोबत कधीच काहीच झालं नाही. मग काय शेवटी सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच शोधायची होती, मग ते होतं तरी काय, सोबत आलेली झुळूक, आत्मा का भूत??? 2010 चा ते काळ,त्या काळात इंटरनेटचा एवढा अतिरेक नव्हता 2G चा to जमाना, तशात आम्ही फेसबुक तेवढं वापरायचो. सोबत घडलेल्या प्रसंगाबाबत अनेकांशी बोललो तेव्हा कळले की हा असा अनुभव आलेला मी एकटाच नाही, अनेक आहेत आणि प्रत्येकांनी त्याला नाव दिलं ते “छातीवरच भूत”. पण आपण विज्ञानाचे विद्यार्थी विचारपूस आणि शोध सुरूच ठेवला पण काही ठोस माहिती सापडली नाही. अश्यातच एके दिवशी फेसबुकवर एक पोस्ट बघितली त्यात छातीवर भूत बसलेले होते असे चित्र आणि त्याला नाव दिले होते “डिमाँन पॅरालिसिस”. हीच होती माझ्या प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात आणि मग शोध घेतला तेव्हा कळले की हे “छातीवरचे भूत” म्हणजेच मेडिकल सायन्सच्या भाषेत “स्लीप पॅरालिसिस” किंवा “डिमाँन पॅरालिसिस”. स्लीप पॅरालिसिस – ही अशी परिस्थिती आहे ज्यात झोपेत असताना किंवा झोपेतून उठताना कोणीतरी आपल्या छातीवर बसल्याची अनुभूती होते. काही मिनिट शरीर पॅरालिसिस झाले की काय असा अनुभव येतो, काहीच हालचाल होत नाही. आपण गुदमरतो का असा अनुभव येतो आणि डोळ्यांसमोर असते ती एक आकृती किंवा भूत (काल्पनिक). पण ज्यावेळेस आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो तेव्हा सर्व नॉर्मल झाल्यासारखं वाटत. ना भूत ना आत्मा. फक्त एक प्रश्नचिन्ह “ते काय होते”? कोणी त्या प्रश्नांचा शोध घेतो तर कोणी वाईट स्वप्न म्हणून सोडून देतो. पण मला वाटत कदाचित हीच परिस्थिती जर का कमजोर मनाच्या व्यक्तीवर आली तर तो नक्कीच अटॅक येऊन मरेलच. आपण अनेक वेळा ऐकतो की अमुक व्यक्ती झोपेतच अटॅक मुळे गेला तमुक व्यक्ती झोपेतच अटॅक मुळे गेला. झोपेत अटॅक येऊन व्यक्ती गेल्याचे अनेक वेळा आपण ऐकतो, त्यामागील मेडिकलच्या भाषेत अनेक कारण असतील. पण एक कारण “छातीवरचे भूत/स्लीप पॅरालिसिस” हेही असू शकते का हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. शेवटी आभार मानतो प्रगत मेडिकल सायन्सचे आणि त्यात दिवसेंदिवस होणाऱ्या नव नवीन शोधाचे, ज्यामुळे माझ्यामानात मावशीच्या त्या गावाबद्दल बसलेली भीती कायमची निघून गेली.

लेखक डॉ. प्रेमजीत जाधव

सहा. प्राध्यापक

मू. जे. महाविद्यालय,

जळगाव

मोबाईल – 8390636707 premjadhav88@gmail.com

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जीवनातील ऊब आणि थंड झालेला चहा (ललित लेख )

October 31, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.