जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत व्यवस्थापन शाखेतील ऍग्री बिझनेस विभागातर्फे १५ ऑक्टो जागतिक अन्न दिवस २०२५ चे महत्व लक्षात घेऊन ”एक मुठ्ठी अनाज व लोकांना बी व बियाणे मोफतउपलब्ध करून देणे”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जगातील सुमारे ७०० दशलक्ष लोक दररोज भुकेने त्रस्त असतात, तर अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कोट्यवधी लोक अन्नाच्या अभावामुळे मृत्युमुखी पडतात. खास करून विकसनशील देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. गरीब लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाचा योग्य वापर आणि वितरण, कृषी उत्पादनात सुधारणा करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यामुळे या समस्येवर काही प्रमाणात मात होऊ शकते. अन्न दिन म्हणजे फक्त एक दिवस नव्हे, तर तो मानवतेच्या सेवेसाठी आणि जगातील प्रत्येक माणसाला मूलभूत गरज असलेल्या अन्नाच्या हक्कासाठी दिलेला एक मोठा संदेश आहे. या दिवसामुळे आपल्याला हे लक्षात येते की, अन्नाचे महत्त्व किती मोठे आहे आणि प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहावे लागेल.आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी, शासनाच्या धोरणांद्वारे आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जगातील भुकेच्या समस्येवर मात करता येऊ शकते. त्यामुळे जागतिक अन्न दिन आपल्यासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात अन्नाचे महत्त्व जाणून घेऊ शकतो आणि भविष्यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योगदान देऊ शकतो.असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी भाषणात सांगितले . महाविद्यालयत संकलन केलेलं अन्न पाकीट जळगाव मधील रिमांड होम ला देण्यात आली तसेच कारले,भेंडी,ज्वारी,कोथिबीर यांची बी व बियाणे मोफत पुरविणे या प्रकारची मोहीम” राबविण्यात आली या मोहिमेमध्ये विविध प्रकारच्या बी जेणेकरून त्याचे योग्य वाटप करता येईल. या मोहिमेला सुमंगल एन्टरप्राइझ चे संचालक प्रा. सारिका तोतला यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थतीत होते . कार्यक्रमाचे आयोजन ऍग्री बिझनेस विभागप्रमुख डॉ. वीणा भोसले व प्रा. तनया भाटिया यांनी केले
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
