कोळगाव -आपले जीवन जगण्यासाठी व रोजगार मिळवण्या साठी आर्थिक गोष्टी साठी विज्ञान शाखेचे योगदान महत्वाचे आहे रसायन शास्त्र ची पदवी घेतली तर अन्न प्रक्रिया, सौर क्षेत्र, पेट्रोल, डिझेल, गॅस, बॅटरी व्यवसाय, प्लास्टिक, फायबर, सिंथेटीक कपडे, रंग, सिमेंट, स्टील धातूचे उद्योगात व्यवसाय व कंपन्या मध्ये संधी मिळतात, आपल्या भारतीय रसायन शास्त्र मध्ये संशोधन कार्य आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी महत्वाचे योगदान दिले असल्याने ते रसायन शास्त्रा चे जनक संबो धीले जाते ” असे उदघाटन पर विचार भडगाव महाविद्यालयाचे रसायन विभाग प्रमुख प्रा संजय झाल्टे यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मंडळाचे उद्घाटन करताना म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्या लयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी वनस्पती शास्त्र बद्दल माहिती प्रा सुनीता पाटील यांनी विध्यार्थी ना दिली, यावेळी प्रा संजय झाल्टे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे समाजातील महत्त्व,संशोधनातील गरज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकासाच्या संबंधी मार्गदर्शन केले यावर्षी विज्ञान मंडळाच्या आजचे भारतीय विज्ञानातील विध्यार्थी प्रिय संशोधक आचार्य प्रफुल्लचंद रे हा होता ते भारतीय रसायन शास्त्रचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात, श्री प्रफुल्लचंद्र रे यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात आला त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचा परिचय विद्यार्थ्यांना झाला यावेळी प्रा डॉ सोपान साळुंखे(एरंडोल) प्रा. नरेंद्र भावसार(पारोळा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायन विभाग प्रमुख प्रा. सौं.पी डी पाटील यानी केले त्यांनी कार्यक्रमाची अपेक्षा आणि उद्दिष्ट स्पष्ट केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन प्रा.सुनीता पाटील यांनी तर आभार मनीषा भोसले यांनी मानले यावेळी प्रा मनोज पवार, प्रा दिनकर सूर्यवंशी, प्रा तुषार पाटील, प्रा राहूल सोनवणे, सनी पाटील, श्रीकांत हिरे, तेजस पवार, चेतन पाटील तसेच विद्यार्थी विध्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते —- प्रा संजय झाल्टे यांनी 25 यावर्षी रसायन नोबेल पारितोषिक विजेते सुसुमू कीटगावा, रिचार्ड रोब्सन यांना मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क साठी मिळाले 24 चे प्रथीने डिझाईन करण्याच्या संगणकीय पद्धतीसाठी डेव्हीड बाकर, जॉन जंपर यांना मिळाला तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोयेल मोकीर, फिलिप्स अगीयो, आणि पिटर हॉवीट यांचा उल्लेख केला
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
