
जळगाव -कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संलग्न असलेल्या के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या शिबिरात डॉ. महेंद्र पाटील यांनी आपली सेवा प्रदान करून विद्यार्थ्यांची रक्तदाब, वजन, दृष्टी, हिमोग्लोबिन, तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना संतुलित आहार, व्यायाम, आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुंगंधी सर यांचे प्रेरणेने आणि व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. डिगंबर सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन व समन्वयक प्रा. सुनील विसपुते यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासोबतच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महाविद्यालयाने अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दिशा दृढ केली आहे.
