सोयगाव / प्रतिनिधी
विजय पगारे
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव जि .छ. संभाजीनगर येथे आज विद्यार्थ्यांनी आपल्या कुशल हातांनी मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची सुंदर निर्मिती करून इतिहासाला जिवंत केले. “मातीतील किल्ला” या स्पर्धेचे आयोजन केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान, ऐतिहासिक जागरूकता आणि सृजनशीलतेचा विकास झाला.यास्पर्धेत शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनीनी उत्स्फूर्त सहभाग नोदविला

या स्पर्धेचे उद्घाटन आणि परीक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. तातेराव माळी (सहायक गटविकास अधिकारी, पं. स. सोयगाव), श्री. महेंद्रसिंग पाटील (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पं. स. सोयगाव),समाजसेवक व शिक्षणप्रेमी नगरसेवक राजेंद्र दुतोंडे, केंद्रप्रमुख फिरोज तडवी सर, मुख्याध्यापक रामदास फुसे सर, प्रशांत पाटील सर,तसेच शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरेखा चौधरी मॅडम, मंगला बोरसे मॅडम, प्रतिभा कोळी मॅडम, रामचंद्र महाकाळ सर, अनिल देसाई सर, तानाजी चव्हाण, बागवान सर ,भास्कर चौधरी, शुभम देसले, पुनम कल्याणकर, अंकुश काळे यांच्यासह इतर शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा उत्कृष्ट संगम घडवत “राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड, सिंहगड” यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे सुंदर नमुने साकारले. या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. या स्पर्धेत विविध जाती, धर्म, समाजातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन “बहुजन समाजातील अठरापगड जातींचा सहभाग” अशा ऐक्यदर्शक वातावरणात कार्य केले. हा उपक्रम “शिवरायांचे विचार आणि संस्कार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे” एक प्रभावी उदाहरण ठरला यावेळी तातेराव माळी यांना विद्यार्थ्याना रोख अकराशे व महेंद्रसिग पाटील यांनीही रोख आकर्षक बक्षिस दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशलतेने करण्यात आले तर शेवटी मुख्याध्यापक किरण पाटील सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, सर्जनशीलता आणि स्वाभिमान जागवतात. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव यांचे हे उपक्रमशील कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
