जळगाव -कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने दि.०८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या युवारंग -२०२५ या रौप्य महोत्सवी युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने दिमाखात सर्व साधारण विजेते पद प्राप्त केले आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयात सर्व विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी जल्लोष साजरा करत आंनद प्रकट केला.यावेळी सर्व पारितोषिक, स्मृती चिह्ने आणि प्रमाणपत्र यांची आरास रचण्यात आली. विविध बक्षिसांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केसीई सोसायटीचे शैक्षणिक संचालक डॉ.मृणालिनी फडणवीस, प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वडोदकर, श्री.चारुदत्त गोखले, मानव्य शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.मनोज चोपडा, अधिष्ठाता डॉ.भूपेंद्र केसूर, अधिष्ठाता डॉ.देवानंद सोनार,डॉ.मनोज महाजन, डॉ.विजय लोहार, डॉ.योगेश महाले, डॉ.गायत्री खडके, ओजस्विनी कला विभागाचे प्रा.मिलन भामरे, प्रा.हेमंत पाटील, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.वर्षा उपाध्ये, प्रा.अजय शिंदे, प्रा.देवेंद्र गुरव, प्रा.वैभव मावळे, प्रा. मंगेश वाघ, श्री.सुभाष तळेले, श्री.दत्तात्रय कापुरे, श्री.युवराज चौधरी, श्री.कुलदीप भालेराव आणि स्पर्धक कलावंत विद्यार्थी उपस्थित होते. या महोत्सवात संगीत कला, नृत्य कला, साहित्य कला, नाट्य कला आणि ललित कला अशा एकूण पाच कलाप्रकारातील एकूण सर्व २६ कला प्रकारांमध्ये मू,जे. महाविद्यायाचे एकूण ४२ स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत पुरुष संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.विजय लोहार, महिला संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.गायत्री खडके आणि सांस्कृतिक समन्वयक म्हणून डॉ.मनोज महाजन आणि सोबत सहकार्यासाठी श्री.दत्तात्रय कापुरे आणि श्री.युवराज चौधरी यांचा सहभाग होता. तसेच कला प्रकारांमधील विविध स्पर्धांच्या तयारीसाठी प्रा.अजय शिंदे, प्रा.देवेंद्र गुरव, प्रा.वैभव मावळे, प्रा.पियुष बडगुजर, प्रा.मंगेश वाघ, प्रा.मयुरी हरीमकर, प्रा.वर्षा उपाध्ये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात,सांस्कृतिक समन्वयक प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वढोदकर , मू.जे.महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.योगेश महाले, डॉ.नयना पाटील, डॉ.सोनाली शर्मा, डॉ.अनिल क्षीरसागर, प्रा.प्रसाद देसाई, प्रा.हेमंत पाटील, डॉ.विवेक यावलकर, डॉ.विशाल देशमुख, डॉ.एल.पी.वाघ, डॉ.वाय.एस.बोरसे, प्रा.कमलाकर रूगे आणि अन्य प्राध्यापक वेळोवेळी उपस्थित राहिलेत. विविध पारितोषिके आणि विजेते १. सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चैन्पियंसशिप) (स्वर्ण पदके -०९, रजत पदके -०६ आणि कांस्य पदके -०२) २. कलाप्रकार निहाय-१. ललितकला (सर्वसाधारण विजेते) २. रंगमंचीय कला प्रकार (सर्वसाधारण विजेते) ३. कै.भाईसाहेब वाय.एस.महाजन मुलींची वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक ४. बहिणाबाई चौधरी एकांकिका करंडक- द्वितीय क्रमांक संगीत कला प्रकारातील बक्षिसे – भारतीय शास्त्रीय वाद्य (ताल वाद्य) – प्रथम क्रमांक, भारतीय शास्त्रीय वाद्य (सूर वाद्य)- प्रथम कमांक, भारतीय समूह गान -प्रथम क्रमांक, भारतीय शास्त्रीय गायन एकल –तृतीय क्रमांक, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद – तृतीय क्रमांक नृत्य कला प्रकारातील बक्षिसे – भारतीय शास्त्रीय नृत्य – द्वितीय क्रमांक रंगमंचीय कला प्रकारातील बक्षिसे – नक्कल – प्रथम क्रमांक, मूक अभिनय – द्वितीय क्रमांक साहित्य कला प्रकारातील बक्षिसे – वक्तृत्व – प्रथम क्रमांक ललित कला प्रकारातील बक्षिसे -स्थळ चित्र -प्रथम क्रमांक, चिकट कला (कोलाज)- प्रथम क्रमांक, मातीकला -प्रथम क्रमांक, व्यंग्य चित्र- प्रथम क्रमांक, पोस्टर मेकिंग- द्वितीय क्रमांक, रांगोळी -द्वितीय क्रमांक, स्थळ छायाचित्र- द्वितीय क्रमांक
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
