भडगाव -विदयापीठ हे उच्च शिक्षणासाठीचे केंद्र असले तरी आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार अशा समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व कार्यक्रम आखले जातात याचा सर्वसामान्य नागरिकांनी फायदा घ्यावा. विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागातर्फे शाळा बाह्य घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर करावे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परिसरात सहली आयोजन करून आपले विद्यापीठ विद्यार्थ्यांना दाखवावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल नाना पाटील यांनी जागृती सार्वजनिक वाचना लयतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी वाय. एम. खान हायस्कूलच्या अध्यक्षा करीना खान ह्या होत्या. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते विजय देशपांडे, मंडळाचे अध्यक्ष अतुल परदेशी हे होते. कार्यशालेत 40 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.
अवांतर वाचनाने माणसाचे वक्तृत्व व कर्तृत्व बहरते, माणसाने जीवनात शेवटपर्यंत वाचत रहावे म्हणून आजीवन शिक्षण असे म्हटले आहे, वाचनाने माणसाचा आत्मविश्वास वाढतो, वाचनाची सवय लावण्यासाठी लहान लहान गोष्टींची पुस्तकं, वृतपत्र वाचावीत व मग चरित्र ग्रंथ वाचावेत असे आवाहन केले माणसाचं व्यक्तिमत्व हे बाह्य सौंदर्यावर अवलंबून नसून आपले विचार कसे आहेत यावर अवलंबुन असते. अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण चौफेर वाचन केले पाहिजे यामुळे आपणास विविध मूल्यांची जाणीव होते असे विचार वाचनातून मूल्यसवर्धन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलतांना डॉ. सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. दीपक मराठे आभार सुरेश भंडारी यांनी व्यक्त केले.
