जळगाव – के.सी.ई. बी.एड. कॉलेजमध्ये बी.एड. आंतरवासीयतेच्या अनुषंगाने सहविचार सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली.प्रास्ताविक प्रा.नयन पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरवासीयता ही शिक्षक शिक्षणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे सांगण्यात आले.
यानंतर पाहुण्यांचा परिचय, स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ अनिल झोपे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. यांनी आपल्या भाश्नातीन विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित होते. आणि शिक्षण व्यवस्थेची जाणीव करून दिली.
उपस्थित मुख्याध्यापकांचा सत्कार आणि स्वागत करण्यात आले यावेळी जळगाव शहरातील १७ शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यानंतर उपप्राचार्यांचे डॉ केतन चौधरी यांनी आपले मनोगत सादर झाले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्यां डॉ अशोक राणे यांनी विद्यार्थी-शिक्षकांना या अनुभवातून आत्मविकास आणि व्यावसायिक प्रगल्भतेकडे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ नयन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने झाला.
