जळगाव-भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा,जी.एस.ग्राऊंड, जळगाव येथुन निघणार आहे व या रॅलीचे समापन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येईल. या जनआक्रोश नेतृत्व देवानंद निकम(जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा)हे करतील. 🟣
जनआक्रोश मोर्चाचे हे आहेत राष्ट्रीय व बहुजन समाजाच्या हिताच्या या मुद्दे राष्ट्रीय मुद्दे
१)सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या. २)ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. ३) आदिवासींवर होणा-या अन्यायाच्या विरोधात ४)महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यातुन बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. ५) मुस्लिम समुदायाच्या संवैधानिक अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी व मुस्लिम समुदायासोबत होत असलेल्या मॉब लिचिंगच्या विरोधात ६)एस.सी./एस.टी. व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागु करण्यात यावे.
बहुजन हिताचे मुद्दे १) शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग,एम.एस.पी.लागु करावी. २) जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. ३)एस.सी./एस.टी./एन.टी.व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना नियमित व वेळेत देण्यात यावी. ४)बहुजन व सर्वच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात ५)धर्मांतरीत आदिवासी, ख्रिश्चन व मुस्लिमांसोबत होत असलेल्या भेदभावपुर्ण व्यवहाराच्या विरोधात ६)कंत्राटी पद्धतीने सरकारी व निमसरकारी क्षेत्रात होत असलेल्या भरतीच्या विरोधात ७)सर्व कर्मचारी व कामगारांना आमदार व खासदारांसारखीच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ८)खाजगी क्षेत्रातील कामगार,मजुर, कर्मचारी, यांच्यासाठी सन्मानजनक पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ९) राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणातील बहुजन विरोधी निती,धोरणे व तरतुदींच्या विरोधात १०)खाजगी शैक्षणिक संस्थाकडुन फी च्या नावाखाली पालकांची लुट थांबवली जावी. ११)EWS आरक्षण असंवैधानिक आहे,ते रद्द करण्यात यावे. १२)दिपनगर येथील राखेपासुन तयार होणारे प्रदुषण रोखणेबाबत १३) जळगावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे. १४)प्रिपेड डिजिटल मीटर बसविण्याच्या विरोधात… या सर्व मुद्द्यांवर हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व बहुजन बंधु व भगिनींनी उपस्थित द्यावी असे आवाहन सुभाष नावडे पाटील(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),वसंत कोलते(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा) व कुंदन तायडे(जळगाव जिल्हा संयोजक बहुजन क्रा़ती मोर्चा) यांनी केले आहे.
