जळगाव-
एकलव्य विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटाचा संघ पुन्हा एकदा यशस्वी होत विभाग स्तरावर पोहोचला आहे. तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर प्रत्येक सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात पानबारा संघाचा पराभव करत एकलव्य विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटाच्या व्हॉलिबॉल संघाने विभाग स्तरावर मजल मारली आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाने या संघाने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या यशस्वी संघात कर्णधार अशोक पवार, प्रेम अहिरे, साहिल अहिरे, कुलदीप नाईक, सुमित पाडवी, रीतिक वसावे, पियुष वळवी, आदित्य कोकणी , साई सूर्यवंशी, शशिकांत पवार, आनंद सूर्यवंशी , वेदांत गावीत, महेश गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना नितीन पाटील, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश वळवी, शरीफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
