जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स व कॉमर्स, जळगाव च्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल तर्फे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या साठी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. के बी महाजन, शैक्षणिक सल्लागार प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. संदीप पाटील, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, मू. जे. महाविद्यालय, जळगाव हे उपस्थित होते. पाहुण्याचा परिचय प्रा. संदीप पाटील यांनी करून दिला. डॉ. के. बी. महाजन यांनी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, यांनी आपल्या खुमासदार भाषणातून विद्यार्थाना निरनिराळे संयुक्तिक उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. एस. आर. चौधरी, प्रा. शालिनी झोपे व प्रा. जयश्री जाधव व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली.
