जळगाव – के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व “मूल्जियन मायक्रोबायोलाॅजीस्ट्स अँड अल्युमनी असोसिएशन, जळगाव” यांच्या संयुक्त विद्यमाने “सहवास सुक्ष्मजीवांचा, वेध भविष्याचा” या माजी विद्यार्थी मार्गदर्शन व व्याख्यान मालिके अंतर्गत माजी विद्यार्थ्यांचे तीन मार्गदर्शन सत्र पार पडले. सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयातील विद्यार्थ्यांना विविध नोकरी, व्यवसाय व संशोधन संधींची माहीती होऊन त्यांनी आपल्या भविष्याचा वेध घ्यावा, हा या व्याख्यान मालिकेचा उद्देश आहे. सदर मालिकेत आय.पी.सी.ए., मुंबई येथे कार्यरत माजी विद्यार्थी श्री.धनंजय लांडे याने प्रथम व्याख्यान दिले. सुक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेल्या “क्लिनिकल ट्रायल्स” क्षेत्रातील विविध संधींवर त्याने मार्गदर्शन केले. पारंपारिक करिअर सोडून आधुनिकीकरण अंगीकारत आपण नविन क्षेत्र स्वीकारण्याचे त्याने प्रतिपादन केले. मालिकेतील दुसर्या सत्रासाठी विभागातील माजी विद्यार्थी व बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा येथील प्रा.डाॅ.भावना मोहीते उपस्थित होत्या. डाॅ. मोहिते यांनी एम.एस्सी.च्या मुलांना मार्गदर्शन करतांना “शिक्षण व संशोधन क्षेत्रातील संधी” यावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आजच्या आधुनिक जगातील मोह निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आयुष्यात योग्य असणाऱ्या गोष्टीत कसे रमले पाहीजे व त्याचा उपयोग आपल्या अभ्यासातील प्रगतीत कसा केला पाहीजे, यावर भाष्य केले. या महिन्यातील तिसर्या व्याख्यानासाठी मॅनकाईण्ड फार्मा, नाशिक येथे कार्यरत जैवतंत्रज्ञानाचा माजी विद्यार्थी श्री.योगेश क्षत्रीय याने “मार्केटिंग ईन फार्मासुटीकल्स” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्केटिंग कौशल्य, वेळचे नियोजन व योग्य कंपनीची निवड या विषयावर त्याने मार्गदर्शन केले. अशाप्रकारे या महिन्यातील बहुआयामी व्याख्यानमाला पार पाडली. अशाच व्याख्यान माला पुढील महिन्यात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा मानस आहे असे मूल्जियन मायक्रोबायोलाॅजीस्ट्स अँड अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. राजेश सगळगिळे यांनी सांगितले. विभाग प्रमुख प्रा. डाॅ. केतन नारखेडे व प्राचार्य प्रा. डाॅ. सं.ना. भारंबे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
