जळगाव – केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयाच्या ‘रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.’ या समाजाभिमुख रेडिओ केंद्राचे संचालक अमोल देशमुख यांची कम्युनिटी रेडिओ असोसिएशन (सीआरए) या देशातील सर्व समुदाय रेडिओ केंद्रांच्या प्रमुख संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी २०२५ ते २०२६ या कालावधीसाठी निवड झाली आहे. ही निवड सीआरएच्या विद्यमान पदाधिकारी मंडळाच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. देशातील समुदाय रेडिओ केंद्रांच्या हितरक्षणासाठी आणि त्यांच्या कार्याचे समन्वयन करण्यासाठी सीआरए ही संस्था कार्यरत आहे. संस्थेचे प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत – श्री. संदीप परमार (अध्यक्ष), श्री. जितेंद्र शर्मा (सचिव जनरल), श्री. एम. एस. एच. बेग (खजिनदार), सौ. संग्या टंडन (उपाध्यक्ष – मध्य विभाग), डॉ. एस. चंद्रशेखर (उपाध्यक्ष – दक्षिण विभाग), श्री. पहल मन राई (उपाध्यक्ष – ईशान्य विभाग), श्री. परेशकुमार पटेल (उपाध्यक्ष – पश्चिम विभाग), तसेच डॉ. गुरजित कौर चावला, श्री. शिवशंकरस्वामी आणि सौ. गायत्री म्हासके (संयुक्त सचिव). अमोल देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून समुदाय रेडिओच्या माध्यमातून समाजजागृती, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.’ने विविध शासकीय व सामाजिक प्रकल्पांतून लोकाभिमुख कार्यक्रम सादर करून प्रशंसनीय कार्य केले आहे. अमोल देशमुख यांच्या या निवडीबद्दल के. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्हा तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
