जळगाव- महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधणे आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात संगणक प्रयोगशाळा तयार केलेली असून या प्रयोगशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे प्रशिक्षण दिले जाते. नुकताच इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संगणकाच्या विविध घटकांवर आधारित असे डेस्कटॉप कम्प्युटर ,कॉम्प्युटर फुल फॉर्म, आय पॅड, कॉम्प्युटर आउटपुट अँड इनपुट डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक कुलर, टेबल फॅन, मोबाईल फोन, इत्यादीमॉडेल्स बनविले व कॉम्प्युटर पार्ट्स अँड फंक्शन्स जनरेशन ऑफ कम्प्युटर, कॉम्प्युटर्स सॉफ्टवेअर, पार्टस ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन, अँड बेसिक फुल फॉर्म पोस्टर्स तयार केले त्यामध्ये प्रथम क्रमांक ऋषिकेश भरत सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक सार्थक सोनवणे ,तृतीय क्रमांक यश येवले, उत्तेजनार्थ नूतन भारी, सहभागी विद्यार्थी अनन्या मोरे, जीविका पाटील, रितिका मराठे, रिद्धी सोनार, कुमुद रागरे, स्वरा, परिधि महाले ,नितल महाजन, कृष्णा वर्मा यश कुमावत, वैष्णवी साळवे ,सार्थक शूर यांनी सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, विज्ञान शिक्षक पूनम कोल्हे रोहिणी पाटील ज्योती पाचपांडे महेंद्र नेमाडे, मनिषि जयकर यांनी सर्व प्रोजेक्टची पाहणी केली आणि परीक्षण केले सर्व विद्यार्थ्यांना आय.सी.टी प्रशिक्षक स्मिता शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
