जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १२ व १३ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण २७ महाविद्यालयांतील ३८० मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण करण्यात आले मग सहभागी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संगीताच्या तालावर पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली यानंतर विद्यापीठ खेळाडू मथुरा वसावे, नेहा बेलदार, संदीप पावरा व देवसिंग बारेला या खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानात आणली त्या क्रीडा ज्योतीवरून क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या व मु. जे. महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुरेखा पालवे यांच्या हस्ते मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे विधिवत उदघाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर विद्यापीठ खेळाडू रोहित गोसावी याने सहभागी खेळाडुंना शपथ दिली. याप्रसंगी नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य व जळगाव क्रीडा विभाग समितीचे अध्यक्ष डॉ. एल. पी. देशमुख, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. जयवंत मगर, विद्यापीठ अकॅडमिक कौन्सिल सदस्य डॉ. पराग नारखेडे, पाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. लभाने, मू. जे. महाविद्यालय जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. चेतन महाजन तसेच जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री. राजेश जाधव व श्री. इकबाल मिर्झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे सचिव व मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. गोविंद मारतळे, डॉ. संजय चौधरी, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. नवनीत आसी, प्रा. सतीश कोगटा, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. अमर हटकर, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. प्रतिभा ढाके, प्रा. सुभाष वानखेडे, डॉ. वीरेंद्र जाधव, डॉ. अमोल पाटील, डॉ. आर. जी. भालेदकर, डॉ. संतोष बडगुजर, डॉ. उमेश पाटील, डॉ. पी. आर. गवळी, प्रा. हिमाली बोरोले, प्रा. मनोज न्हावी, डॉ. महेश पाटील, डॉ. मुकेश पवार व श्री. साधुराव तागड आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यापीठातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. या स्पर्धेच्या तांत्रिक समितीत डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. गोविंद मारतळे व डॉ. संजय चौधरी यांनी कार्यभार सांभाळला असून पंच म्हणून जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अधिकारी कार्यरत आहेत. विजेत्या खेळाडूंना मु. जे. महाविद्यालयाच्या वतीने सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धा मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच आयोजन प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडत आहे. या स्पर्धेस एकलव्य क्रीडा संकुलाचे कर्मचारी वृंद व के. सी. ई. सोसायटीच्या बी. पी. एड. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
